Aishwarya Narkar : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ‘ऐश्वर्या नारकर’ नेहमीच तिच्या मालिकेतील पात्रामुळे चर्चेत असते. यासोबतच ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर हे कायमच इंस्टाग्रामवर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात.
त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर कधी चाहते प्रेमाचा वर्षाव करतांना दिसतात तर कधी या जोडप्याला ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. नेहमीच रिल्समुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री ‘ऐश्वर्या नारकर’ हिला पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आलं असून, अभिनेत्रीने ट्रोल करणाऱ्या युझरला सडेतोड उत्तर दिलं आहे.
वयाच्या 53 व्या वर्षी देखील ऐश्वर्या नारकर खूप उत्साही आहेत. स्वत: फिट ठेवण्यासाठी त्या खूप मेहनत देखील घेतात. त्यांच्या दिनचर्येचे फोटो त्या सोशल मीडियावरही शेअर करत असतात. ऐश्वर्या यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक फिटनेस संदर्भातील व्हिडीओ शेअर केला होता.
अभिनेत्रीने ‘मॉर्निंग वाइब्स’ असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं होतं. त्यावर अनेक कमेंट्समधून त्यांचं कौतुक करण्यात आलं. पण एक युजरने ‘जवानीमध्ये असे नखरे दाखवायला पाहिजे होतेस…’, अशी कमेंट केली.
त्यावर त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत ‘भाऊ कशाला स्वतःची लायकी दाखवता…’ असं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे. सध्या त्यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
फार कमी कलाकार असतात जे वेळेबरोबर स्वत:ला बदलतात. ऐश्वर्या नारकर अशाच अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्याच्या जमान्यात सोशल मीडियाच महत्त्व ओळखून त्या सोशल मीडियावरही तितक्याच सक्रीय असतात. त्यांची इंस्टाग्रामवर प्रचंड फॉलोईंग आणि क्रेझ आहे.
संख्य मालिका, चित्रपटांमध्ये काम करून ‘ऐश्वर्या नारकर’ने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. सध्या अभिनेत्री झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील रूपाली ही भुमिका बजवतेय.