अमरावती – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज विदर्भ दौऱ्यावर असणार आहेत. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी पवारांच्या मुंबईतील निवासस्थानावर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर पवार यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या पोलिस बंदोवस्तासह शरद पवार आज विदर्भ दौऱ्यावर असणार आहेत.
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सतत शरद पवारांवर टीका करणाऱ्या खासदार नवनीत राणा यांनी आज मात्र शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहे. माध्यमांशी बोलताना राणा म्हणाल्या,’आज मी अमरावतीकरांच्या वतीने शरद पवार यांचे स्वागत करणार आहोत.शरद पवार या महाराष्ट्रचे ग्रेट लीडर आहेत. सगळे जण त्यांच्या विचारांना आत्मसात करून आपल्या राजकारणाची सुरवात करतात.
त्या पुढे म्हणाल्या, मला ही त्यांनी आशीर्वाद दिला आहे. मी त्यांची ऋणी आहे. त्याच्याच आशीर्वादमुळे मी इथपर्यंत पोहचली आहे. पवार साहेब ज्या ठिकाणी जातात त्या सगळ्या बाजू भारी असतात. हे महाराष्ट्राने बघितले आहे.’असं म्हणत राणा शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहे.