मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘जान्हवी कपूर’ ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत जान्हवी चाहत्यांच्या संपर्कात राहते. जान्हवीने खूप कमी काळावधीत इंडस्ट्रीत आपले स्थान मजबुत केले आहे. त्यामुळेच का होईना आज जान्हवीचे नाव सिनेसृष्टीतील आघाडीच्या नायिकांमध्ये घेतले जाते.
जान्हवी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. बऱ्याचवेळा तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. सध्याच्या कॉलेज तरुणी जान्हवीला मोठ्या प्रमाणात फॉलो करतात. आणि तिची प्रत्येक स्टाइल तरुणी फॉलो करतात. नुकतंच जान्हवीचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशलवर व्हायरल झाले आहेत.
दरम्यान, तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या बॅगची चर्चा सध्या सुरु आहे. त्या बॅगची किंमत ऐकून सगळ्यांना धक्का बसला आहे. जान्हवीकडे बॅगचे चांगले कलेक्शन आहे. तिच्याकडे ‘लुई विटन’, ‘गोयार्ड सेंट लुईस’ ‘मोशिनो स्पंजबॉब’ चॅनेल’ ब्रँड्ससह अनेक ब्रँड्सच्या बॅग तिच्याकडे आहेत.
View this post on Instagram
मात्र, अलीकडे, जान्हवीची एक नवीन बॅग पाहायला मिळाली. ही बॅग पिशवीसारखी दिसत असून ती कॉर्नफ्लेक्सवर फ्री मिळाल्यासारखं वाटतं, पण त्याची रक्कम कळल्यावर तुम्हाला धक्का बसेल. जान्हवीची बॅग ‘आन्या ब्रांड्स’ कॉर्नफ्लेक्सची असून, याची किंमत सुमारे 4 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, 4 लाख रुपयांच्या या बॅग वरून नेटकऱ्यांनी जान्हवीला ट्रोल सुद्धा केलं आहे.