मुंबई – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता रणबीर कपूर आणि आलीय भट्ट यांच्या बहुप्रतीक्षित ‘ब्रम्हास्त्र’ या सिनेमाचं ९ सप्टेंबरला होणार प्रदर्शित होणार आहे. यातच या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या चर्चांसोबत रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची बातमी समोर आली आहे.
View this post on Instagram
यावरून आज त्यांच्या लग्नाच्या काही दिवस अगोदर, चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता अयान मुखर्जीने दोघांना एकत्र दाखवणारे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टर मध्ये आलिया भट्ट रणबीर कपूर दिसत आहे. पोस्टरसोबतच चित्रपटातील पहिल्या गाण्याच्या काही ओळीही ऐकायला मिळतात.
हे पोस्टर शेअर करताना अयानने लिहिले,‘प्रेम हा प्रकाश आहे!’ भाग एक: शिव… ब्रह्मास्त्राच्या या पहिल्या अध्यायाला सुरुवात झाली आहे असेही लिहिले आहे. यासोबत ‘आजकाल हवेत अतिरिक्त प्रेम’ असल्याचे संकेतही दिले.
दरम्यान, या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे. या सिनेमाद्वारे रणबीर कपूर आणि आलिया भट्टची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली होती. शिवाय आलिया भट्ट हिने देखील चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती चाहत्यांना काही दिवसांपूर्वी दिली होती. दरम्यान,’ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर आणि आलियासह अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.