लंडन – क्लब विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चेल्सीने सहज विजय मिळवला व अंतिम फेरी गाठली. संघाचा स्टार खेळाडू रोमेलू लुकाकू याने केलेल्या महत्त्वपूर्ण गोलच्या जोरावर चेल्सीने अल हिलाल संघाचा 1-0 असा सहज पराभव केला.
या स्पर्धेत युरोपातील संघांनीच या आंतरखंडीय स्पर्धेवर वर्चस्व गाजवले असून, गेल्या 14 पैकी 13 अंतिम सामन्यांत युरोपातील संघांनीच विजय प्राप्त केले आहेत. चेल्सीला 2012 सालच्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठूनही पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, चेल्सीला यंदा ही स्पर्धा जिंकण्याची पुन्हा संधी मिळणार आहे.