पुणे – डावजे कातवडीचे माजी सरपंच बबन गणपत कदम (वय 70) आणि त्यांच्या पत्नी हौसाबाई कदम यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. डावजे कातावडी ग्रूप ग्रामपंचायतीचे ते दहा वर्षे सरपंच होते. तालुक्यातील विविध सामाजिक कार्यात बबन कदम यांचा सहभाग होता. छावा ग्रूप संघटनेचे महाराष्ट्राचे संघटक राकेश कदम यांचे हो दोघे आजी-आजोबा होते.