पुणे- पोलीस म्हणजे केवळ एक नोकरी नव्हे… तर ती एक सामाजिक बांधलकी आहे… ही भावना मनात असली की आपोआपच सामाजिक जाणीवेतून या पेशाकडे पाहिलं जातं… याचं जीतंजागतं उदाहरण म्हणजे सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगताप… 79 मुलींसह जवळपास अडीचशे महिलांची वेश्यवस्तीतून सुटका… खुनासह अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात महत्वाची भुमिका… या साऱ्याची दखल घेत मिळालेली हजारो पारितोषिके या जाणीवेचाच सन्मान करत असतात.
जगताप यांना समाजसेवेचे बाळकडू घरातूनच मिळाले. मल्ल असणारे आजोबा आनंदराव जगताप यांच्या कुस्तीचा दबदबा पंचक्रोशीत होता. ब्रिटीशांविरोधातील स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी महत्वाची आणि समरणीय कामगिरी बजावली. वडिलांच्या या देशसेवेचा वसा बाणवत गणेश यांचे वडील अशोकही पोलीस दकलात कार्यरत झाले. पोलिस उपनिरीक्षक पदावरून ते 2008 मध्ये निवृत्त झाले. गणेश जगताप यांनी देखील हा वारसा जपत पुणे पोलिस दलात सेवेला सुरूवात केली. सध्या ते विशेष शाखेत कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत खात्याअंतर्गत 268 रिवार्ड, पोलिस महासंचालकांचे पोलिस पदक तर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय योगदान दिल्याबद्दल 93 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत.
जगताप यांनी 1992 पासून मुख्यालय, वाहतुक शाखा, विशेष शाखा, गुन्हे शाखा (सामाजिक सुरक्षा विभाग) येथे 30 वर्ष आपल्या सेवेचा ठसा उमटवला आहे. जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या आरोपीविरुध्द गुन्हे शाखेत असताना त्यांनी तब्बल 192 गुन्हे दाखल करण्यात मदत केली त्यापैकी 53 गुन्हे तर त्यांनी स्वत: माहिती मिळवून दाखल केले. या दलदलीतून 79 अल्पवयीन व 140 सज्ञान विविध राज्यातील, विदेशातील मुलींची सुटका केली. या गुन्ह्यता आरोपींना शिक्षा होईपर्यंत त्यांनी त्याचा मागोवा घेतला. हरवलेल्या 90 मुला-मुलींना शोधून त्यांच्या पालकांकडे सोपवण्यात महत्वाची भूमिका बजावली. हडपसरमध्ये बेपत्ता महिलेच्या खुनाचा छडा लावून आरोपींना जेरबंद करण्यात देखील त्यांची भुमिका महत्वाची होती.
1 मे 2017 रोजी जगताप यांना पोलीस महासंचालक प्रदान करण्यात आले. सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानाच्या वतीने “पुणे भुषण पुरस्कार’, “लोकमंगल गौरव पुरस्कार”, “महाराष्ट्र पोलीस मित्र संघटना पुरस्कार, आदर्श सेवा पुरस्कार, “शालीक डेकाटें” पुरस्कार, समाज गौरव पुरस्कार, कलाउपासक पुरस्कार, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतु तुषार गांधी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार, संत गुरु रोहिदास विचार व समिती पुणे यांच्या वतीने “संत गुरु रोहिदास महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अभ्यासू वृत्तीतून पी. एचडी
नुकतेच दि एम्पायर युनिव्हसिटी कोईमतूर यांचे वतीने पीएच. डी पदवी प्रसिध्द अभिनेता सुमन यांच्यासह तामिळनाडू राज्यपाल यांच्या ऑनलाईन उपस्थितीत प्रदान करण्यात आली. तसेच डिसेंबर 2021 मध्ये सिंधुदूर्ग येथे कै. हेमंत करकरे राष्ट्रीय पुरस्कर श्रीपाद नाईक केंद्रीय राज्यमंत्री जहाजे बंदरे व खासदार विनायक राउत यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.