Federation Cup 2024 : महाराष्ट्राच्या आभाचा गोळाफेकीत राष्ट्रीय विक्रम…

Federation Cup 2024 – महाराष्ट्राच्या आभा खटुआने राष्ट्रीय फेडरेशन कपमध्ये १८.४१ मीटर फेक करून शॉट पुटचा नवा राष्ट्रीय विक्रम केला. तिने प्रथम क्रमांक मिळवत स्वतःचा आणि मनप्रीत कौरचा १८.०६ मीटरचा विक्रम मागे टाकला.
हे अंतर तिने पाचव्या प्रयत्नात पार केले. असे असूनही ती पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकली नाही. ऑलिम्पिकसाठी पात्रता गुण १८.८० मीटर आहे. मात्र, तिला ३० जूनपर्यंत पात्र ठरण्याची संधी आहे. उत्तर प्रदेशची किरण बालियान १६.५४ मीटरसह द्वितीय आणि दिल्लीची सृष्टी विज १६.८६ मीटरसह तृतीय क्रमांकावर राहिली.
National Record Alert!🚨☑️#Shotput
Abha Khatua breaks Manpreet Kaur’s National Record at National Federation Senior Athletics Competition 2️⃣0️⃣2️⃣4️⃣.
With the recording breaking throw of 18.41m, she not only won🥇but also improved her #RoadtoParis ranking for #Paris2024!… pic.twitter.com/oU04ewIjKo
— SAI Media (@Media_SAI) May 13, 2024
चंदाला ८०० मीटरचे सोने मिळाले
पुरुषांच्या २०० मीटरमध्ये ओडिशाच्या अनिमेश कुजूरने २०.६२ सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले. महिलांची ८०० मीटर शर्यत दिल्लीच्या चंदा हिने २ मिनिटे२.६२ सेकंद वेळेसह जिंकली. पंजाबच्या ट्विंकलने २.०३.९४) रौप्य आणि अमनदीप कौर (२.०७.६६) ने कांस्यपदक जिंकले.





