पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे लोकसभा मतदारसंघात 20 लाख 61 हजार 276 मतदारांपैकी 11 लाख 3 हजार 678 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात सरासरी 53.54 टक्के मतदान झाले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानामध्ये 3.4 टक्के म्हणजे जवळपास 69 हजार 524 मतदान वाढले आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. पुणे लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने दुरंगी लढत होती. या निवडणुकीसाठी सोमवारी शांततेत मतदान पार पडले. पुणे मतदारसंघात 60 ते 70 टक्के मतदान होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात मात्र 53.54 टक्के मतदान झाले. 2019 मध्ये 49.84 टक्के मतदान झाले होते. यंदा मतदानामध्ये वाढ झालेली आहे.
पुणे मतदारसंघातील 10 लाख 57 हजार 877 पुरुष मतदारांपैकी 5 लाख 84 हजार 511 मतदारांनी मतदान केले. तर 10 लाख 3 हजार 75 महिला मतदारांपैकी 5 लाख 19 हजार 78 महिला मतदारांनी मतदान केले आहे. पुरुष मतदारांची मतदानाची टक्केवारी 55.25 टक्के तर 51.75 टक्के महिला मतदारांनी मतदान केले आहे. एकंदर आकडेवारी पाहता सर्वाधिक मतदान हे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात झाले आहे, या मतदारसंघात 2 लाख 41 हजार 817 मतदारांनी मतदान केले.
पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदानाची आकडेवारी
विधानसभा मतदारसंघ – वर्ष 2014 – वर्ष 2019 – वर्ष 2024
वडगावशेरी – 51 टक्के – 46.41 टक्के – 51.27 टक्के
शिवाजीनगर – 53टक्के – 46.94 टक्के – 50.67 टक्के
कोथरूड – 55 टक्के – 50.26 टक्के – 52.43 टक्के
पर्वती – 54.88 टक्के – 52.07 टक्के – 55.47 टक्के
पुणे कॅन्टोन्मेंट – 48 टक्के – 48.79 टक्के – 53.13 टक्के
कसबा पेठ – 58 टक्के- 55.88 टक्के – 59.24 टक्के
एकूण – 54.11 टक्के – 49.84 टक्के – 53.54 टक्के
पुणे लोकसभा मतदारसंघातील एकूण मतदान
विधानसभा – एकूण मतदार – झालेले मतदान
वडगाव शेरी – 4,67,669 – 2,41,817
शिवाजीनगर – 2,78,530 – 1,41,133
कोथरुड – 4,14,755 – 2,17,455
पर्वती – 3,41,055 – 1,89,184
पुणे कॅन्टोन्मेट – 2,82,270 – 1,49,984
कसबा पेठ – 2,76,997 – 1,64,105
एकूण – 20,61,276 – 11,03,678
2019 च्या तुलनेत 2024 मध्ये मतदानातील फरक
विधानसभा – 2019 – 2024 – फरक
वडगाव शेरी – 2,06,181 – 2,41,817 – 35,636 वाढ
शिवाजीनगर – 1,42,186 – 1,41,133 – 1,053 कमी
कोथरुड – 2,00,527 – 2,17,455 – 16,928 वाढ
पर्वती – 1,83,480 – 1,89,184 – 5,704 वाढ
पुणे कॅन्टोन्मेट – 1,34,154 – 1,49,984 – 15,830 वाढ
कसबा पेठ – 1,61,497 – 1,64,105 – 2,608 वाढ
एकूण – 10,34,154 – 11,03,678 – 69,524 वाढ