शिल्पा शेट्टीने तिच्या “हंगामा 2’चे शुटिंग या बुधवारी सुरू केले. या सिनेमाच्या सेटवरील धमाल मस्तीचा व्हिडीओ शिल्पाने आपल्या फ्रेन्ड सर्कलबरोबर शेअर केला आहे.
प्रियदर्शन या आपल्या आवडत्या डायरेक्टरबरोबर काम करताना खूप मस्त वाटते आहे, यावेळी आपल्या मनामध्ये “आनंद, धाकधुक, खळबळ, चिंता, नम्र आणि धन्यता’ अशा खूप संमिश्र भावना असल्याचे शिल्पाने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. आपल्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात करताना आपल्याला फॅन्सचा सपोर्ट आवश्यक असल्याचेही तिने म्हटले आहे.
पहिल्या दिवशी सेटवर येत असतानाचा आपला एक व्हिडीओही तिने पोस्ट केला आहे. त्यात तिची हेअर स्टाईल बदलेली स्पष्ट दिसते. “हंगामा 2’मध्ये शिल्पाबरोबर परेश रावल असेल. परेश रावल आणि प्रियदर्शनही 7 वर्षांनी एकत्र काम करत आहेत.
यापूर्वी “हेराफेरी’, “भागमभाग’ आणि “मालामाल वीकली’ या कॉमेडी सिनेमांमध्ये परेश-प्रियदर्शनची जोडी एकत्र होती. “हंगामा 2′ मध्ये मिरझान झाफरी आणि दक्षिणात्य ऍक्ट्रेस प्रणिता सुभाष हे लीड रोलमध्ये असतील. याच वर्षी 14 ऑगस्टला हा सिक्वेल प्रेक्षकांना मनमुराद हसवण्यासाठी येतो आहे.