कॅनेडियन गायक आणि लेखक जस्टिन बीबर सध्या एका धोकादायक संसर्गजन्य आजाराशी झुंज देत आहेत. 25 वर्षीय गायक जस्टिन याने बुधवारी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट लिहून ही माहिती दिली आहे.
बीबर म्हणतोय, या रोगाचे निदान नुकतेच झाले आहे. जे सामान्यत: बॅक्टेरियांमुळे होते. त्याची लक्षणे नैराश्याच्या अवस्थेसारखी आहेत. ज्यामुळे तो रोग अधिक धोकादायक बनतो.
View this post on Instagram
त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, अनेक जण जेव्हा म्हणतात की जस्टिन बीबर शि*** सारखा दिसत आहे, मेथम्फेटामीन घेत आहे. तेव्हा मला या रोगाचे निदान झाले. फक्त एवढेच नव्हे तर त्याचा परिणाम माझ्या त्वचा, मन, ऊर्जा आणि आरोग्यावरही होत आहे.
ग्रॅमी विजेता गायक म्हणतो, मी आपल्या आगामी “जस्टिन बीबर: सीजन्स’ या डॉक्यूमेंट्री सीरीजमध्ये या संक्रमणाबाबत बोलणार आहे. ही सीरीज 27 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
10 भागांच्या या शोमध्ये बीबर आपल्या नवीन अल्बमच्या निर्माण प्रक्रियेसोबतच वैयक्तिक जीवन दाखविणार आहे. शेवटी त्यांनी लिहिले, “मी या समस्येचा कसा सामना करीत आहे आणि कसे बरे करावे हे आपण शिकू शकता!’.