पुणे – गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या थंडीचा कडाका आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता स्कायमेट वेदरने वर्तविली आहे. शुक्रवारच्या तुलनेत पुढील दोन दिवसांत तापमानाचा पारा वाढणार असला,
तरीदेखील थंडीचा कडाका कायम राहण्याची आहे. वातावरणातील धुके आणखी एक दिवस असणार आहे. त्यानंतर आकाश निरभ्रराहून, वातावरण कोरडे राहणार आहे.