नितेश तिवारी यांच्या “रामायण’ या बिग बजेट सिनेमामध्ये हृतिक रोशन रावणाच्या भूमिकेत आणि दक्षिणात्य स्टार महेश बाबू रामाच्या भूमिकेत दिसणार असे समजले होते.
मात्र आता या दोघांचाही या सिनेमातून पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाल्याची खबर मिळाली आहे. हे दोघेही आगामी काही महिने तरी आपापल्या पहिल्याच अन्य सिनेमांच्या शुटिंगमध्ये व्यस्त असणार आहेत.
त्यामुळे या दोघांकडेही “रामायण’च्या शुटिंगसाठी अजिबात वेळच नाही. “रामायण’च्या निर्मात्यांकडून स्क्रीप्टवर काम सुरू झाले आहे. सीन लिहायलाही सुरुवात झाली आहे.
जर प्री-प्रॉडक्शनचे काम संपेपर्यंत या दोन्ही कलाकारांना रिकामा वेळ मिळाला तर ठीक अन्यथा या दोघांचीही या सिनेमातून गच्छंती केली जाऊ शकते आणि अन्य दोन कलाकारांबरोबर या सिनेमाचे शुटिंग सुरू केले जाऊ शकते.