क्राइम पेट्रोल फेम अनुप सोनी लवकरच नव्या चित्रपटात दिसणार आहे. मर्डर मिस्ट्री वर आधारित रात बाकी है या चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत अनुप सोनी दिसणार. तो एका लेखकाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 16 एप्रिल रोजी झी5 या डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार.
चित्रपटाची कथा अनुप सोनीभोवती फिरते. चित्रपट लेखकाची भूमिका साकारत असणारा अनुप सोनी एका खुनाच्या आरोपात अडकतो. खुनाच्या प्रकणातून स्वत:ला वाचवण्यासाठी तो प्रयत्न करतो. मग यामागील आरोपी कोण असेल हे कोडे संपूर्ण चित्रपटामध्ये प्रेक्षकांना गुंतवूण ठेवते. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट एक मर्डर मिस्ट्री आहे जी एका रात्रीची कथा आहे.