मुंबई – हृतिक रोशनच्या फायटर या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना पहिल्यांदाच दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशनची जोडी पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात पहिल्यांदाच या फ्रेश जोडीला पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. या चित्रपटाबाबतची महत्वाची अपडेट समोर आली आहे.
नुकतंच हृतिक रोशनने 2024 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे तिसरे शेड्यूल देखील पूर्ण केले आहे. यासोबतच शूटिंग संपल्यानंतर ह्रितिकने असा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढलीय आहे.
या चित्रपटाचे शेड्युल पूर्ण केल्यानंतर हृतिक रोशनने इंस्टाग्रामवर एक अप्रतिम व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ विमानातील आहे. या व्हिडिओमध्ये, विमान सुरुवातीला पूर्णपणे रिकामे होते आणि हळूहळू ते चित्रपटाच्या संपूर्ण क्रूने भरून जाते. संपूर्ण कलाकार आणि क्रू विमानात ‘फायटर-फाइटर’च्या घोषणा देताना दिसत आहेत. यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक ह्रितिकसोबत येऊन संपूर्ण क्रूचे आभार व्यक्त करताना व्हिडिओमध्ये दिसतात.
#Fighter Schedule Wrap. pic.twitter.com/kADy9S15g0
— Hrithik Roshan (@iHrithik) March 6, 2023
चित्रपटगृहांमध्ये ‘फायटर’ पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘हा व्हिडीओ बघून गूजबंप्स झाले’. दुसर्या यूजरने लिहिले, ‘फायटरची आतुरता आणखी वाढली आहे’.विक्रम वेधानानंतर हृतिक रोशनचे हे जबरदस्त कमबॅक ठरणार आहे. म्हणून चाहते ट्रेलरची वाट पाहत आहेत.