Krrish 4 Shooting| अभिनेता हृतिक रोशनचा जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. अनेक सुपरहिट चित्रपट त्याने दिल्यानंतर आजही त्याच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहतात. हृतिकचा ‘कोई मिल गया’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटानंतर क्रिश आणि क्रिश 3 हे चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. यानंतर आता त्याच्या ‘क्रिश 4’ या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन आणि प्रमुख अभिनेता हृतिक रोशन सध्या ‘क्रिश 4’च्या पटकथेवर काम करत असून, या वर्षाच्या शेवटापर्यंत पटकथा निश्चित होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हृतिक रोशन 2025 मध्ये ‘क्रिश 4’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्याची शक्यता आहे. या चित्रपटात राकेश रोशन मोठी मेहनत घेत आहेत.
एका मुलाखतीत राकेश रोशन म्हणाले, “मी आतून समाधानी होईपर्यंत मी ‘क्रिश 4’ बनवणार नाही. आम्ही स्क्रिप्ट तयार केली आहे, पण तरीही आम्ही त्यात सुधारणा करत आहोत. आम्ही स्क्रिप्ट तयार केली आहे, पण तरीही आम्ही त्यात सुधारणा करत आहोत. “मला अजूनही वाटते की सुधारण्यासाठी काही जागा आहे.”
दरम्यान, राकेश आणि हृतिक यांना प्रेक्षकांसमोर दमदार चित्रपट सादर करायचा आहे. त्यामुळे चित्रपटाची पटकथा अंतिम करण्यासाठी ते वेळ घेत आहेत. जर या वर्षाच्या शेवटापर्यंत पटकथा निश्चित झाली तर 2025 मध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होईल. सध्या हृतिक रोशन ‘वॉर 2’च्या शूटिंगमध्ये देखील व्यस्त आहे. Krrish 4 Shooting|
‘क्रिश 4’ अंतराळ प्रवासावर आधारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. राकेश आणि हृतिक रोशन 2025 मध्ये ‘क्रिश’ मालिकेतील चौथ्या भागाचे चित्रीकरण सुरू करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी प्रेक्षकांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
हृतिक रोशनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘फाइटर’ या चित्रपटात तो शेवटचा दीपिका पदुकोणसोबत दिसला होता. तर त्याचा ‘वॉर 2’ पुढील वर्षी ऑगस्टमध्ये रिलीज होणार आहे. Krrish 4 Shooting|
हेही वाचा: