Hrithik Roshan : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा फायटर सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानंतर आता हृतिकची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर हृतिकने एक पोस्ट शेअर केली आहे. मात्र त्याने शेअर केलेला फोटो पाहून चाहते हृतिकच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त करत आहेत.
हृतिकने शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याच्या कमरेला पट्टा लावलेला दिसत आहे. याशिवाय तो कुबड्यांच्या आधारे उभा असल्याचंही फोटोत पाहायला मिळत आहे. हृतिक रोशनच्या कमरेच्या स्नायूमध्ये ताण असल्याने त्याला कुबड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. हा फोटो शेअर करत हृतिकने नेमकं काय घडलं याची माहिती पोस्टद्वारे सांगितली आहे. हृतिकने पोस्टमध्ये लिहिले की, “तुमच्यापैकी किती लोकांना कुबड्या किंवा व्हिलचेअरचा आधार घ्यावा लागला आहे? त्यावेळी तुम्हाला काय वाटलं? मला आठवते की माझ्या आजोबांनी एअरपोर्टवर व्हिलचेअरवर बसण्यास नकार दिला होता. कारण, अनोळखी लोकांसमोर त्यांना स्वत:ला कमजोर दाखवायचे नव्हते.”
View this post on Instagram
तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की ही एक जखम आहे. याचा तुमच्या वयाशी काहीही संबंध नाही. यामुळे तुमची जखम लवकर बरी होईल. पण, हा विचार करून मला दु:ख होतं की शरमेमुळे ते स्वत:ला मजबूत दाखवत होते. मला या गोष्टीचा अर्थ समजला नव्हता. त्यांना वयामुळे नाही तर जखम झाल्यामुळे व्हील चेअरची गरज असल्याचं मला वाटलं होतं. पण, व्हिलचेअरचा वयाशी काहीही संबंध नसतो. तेव्हा त्यांनी अनोळखी लोकांसमोर व्हिलचेअर वापरण्यास नकार दिला पण यामुळे उपचारासही विलंब झाला.”
या पोस्टद्वारे हृतिकने त्याच्या आजोबांबाबत घडलेला किस्सा सांगितला आहे. या पोस्टनंतर चाहत्यांनी हृतिकला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.हृ तिक रोशनचा फायटर हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे. जगभरात 300 कोटींहून अधिक व्यवसाय करणाऱ्या या अभिनेत्याच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 200 कोटींचा गल्ला जमवला आहे. यानंतर हृतिक वॉर 2 आणि क्रीश 4 मध्ये दिसणार आहे.