पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाचा मोबदला कसा द्यायचा?

शुक्रवारी बैठक : चार पर्यायांचा प्रस्ताव शासन दरबारी

पुणे : पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित “छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळा’साठी भूसंपादन आणि मोबदला देण्यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी येत्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुरंदर विमानतळासाठीच्या जागेपासून ते सर्व प्रकाराच्या मान्यता यापूर्वीच केंद्र आणि राज्य सरकराकडून देण्यात आला आहेत. केवळ भूसंपादन हा एक महत्त्वाचा टप्पा बाकी आहे. भूसंपादनासाठी कोणते मॉडेल राबवायचे, यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. यापूर्वी झालेल्या बैठकीत पवार यांनी पुरंदर विमानतळासाठी आवश्यक भूसंपादन करण्याबरोबरच चांगले अधिकारी नेमण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार उपजिल्हाधिकारी दर्जाच्या चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, करोनामुळे हे काम थांबले होते.

विमानतळाच्या भूसंपादनासाठी यापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून चार पर्याय सुचविण्यात आले आहेत. यांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. त्यावर शुक्रवारी चर्चा होणार आहे. आवश्यकता भासल्यास राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीकडे मान्यतेसाठी जावे लागणार आहे, असे राव यांनी सांगितले.

पुरंदर येथे विमानतळ उभारण्यासाठी सुमारे 2 हजार 832 हेक्टर जागा लागणार आहे. या कामासाठी विमानतळ विकास कंपनीला विशेष अधिकार देण्यात आले आहेत. 2 हजार 832 हेक्टर पैकी 2 हजार हेक्टरवर प्रत्यक्षात विमानतळ उभारण्यात येणार आहे. जागेच्या भूसंपादनासाठी सहा हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित असल्याचे राव यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.