विरोधकांची संपत्ती कशी बदलत गेली

अशोक खांडेभराड : आमदार गोरेंच्या प्रचारार्थ पाईट येथे सभा

पाईट- खेड-आळंदी विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची संपत्ती कशी बदलत गेली, याचाही अवश्‍य विचार करा. पैसा मिळवणे वाईट नाही; मात्र तो कोणत्या मार्गाने मिळवला हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कसल्याही लक्षणीय उद्योग-व्यवसायाशिवाय किंवा शेती न करत विरोधी उमेदवारांची कित्येक पटींनी संपत्ती वाढली कशी? याचा मतदारांनीच विचार करावा, असे आवाहन अशोक खांडेभराड यांनी केला.

खेड-आळंदी मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार आमदार सुरेश गोरे यांचा पाईट परिसरात गुरुवारी (दि. 17) प्रचार झाला. या दौऱ्यात पाईट येथे झालेल्या सभेत अशोक खांडेभराड बोलत होते. यावेळी जिल्हा परिसद सदस्य रुपाली कड, पंचायत समिती सभापती सुभद्रा शिंदे, उपसभापती भगवान पोखरकर, सदस्य अमर कांबळे, छोटा पुढारी घनश्‍याम दराडे, जिल्हा संघटक विजया शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे, पी. टी. शिंदे, सखाराम खेंगले, राजुशेठ जवळेकर, रामहरी आवटे, महादेव लिंभोरे, दत्ताशेठ रौंधळ, रामदास खेंगले, सचिन वाघमारे, किरण चोरगे, अंकुश दरेकर, मुरलीधर गुरव, कैलास सोनवणे यांच्यासह शिवसेनेचे त्याभागातील पदाधिकारी पाईट परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

अशोक खांडेभराड म्हणाले की, मागील काळात सत्तेत असलेल्या विरोधी उमेदवारांनी आपल्या नातेवाईक आणि मित्रांच्या नावावर करोडोंची माया गोळा केल्याचे सर्वश्रुत आहे. यंदाच्या निवडणुकीत उतरलेल्या जमीन व्यवहारातील ताबेबाज उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रात स्थावर व जंगम मालमत्ता दर्शविताना अक्षरशः सातबारा उताऱ्यांची पोती प्रशासनाकडे दाखल केली आहेत, असे त्यांनी नमूद केले.

  • खेड तालुक्‍यात सुमारे 800 कोटींची विकासकामे मार्गी लावली असून त्यापैकी पाईट परिसरामध्ये 8.5 कोटींची विकास कामे केली आहेत. भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांची कामे मार्गी लावली. त्यामुळेच माझी महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली. काही उमेदवार माझी ही शेवटची निवडणूक आहे. असे म्हणून धूर्तपणा करत आहेत. सत्तेत असताना कामे न करता आपले अज्ञान झाकण्यासाठी जाणूनबुजून जनतेला त्रास दिला व सत्ता असताना काहीही दिवा न लावता फक्‍त मलई खाली अशा लोकांना जनता आता जनता कायमस्वरूपी घरचा रस्ता दाखवणार आहेत.
    – सुरेश गोरे, आमदार
  • मनसेचा पाठिंबा
    खेड तालुका महाराष्ट्रनिर्माण सेनेने शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे यांना जाहीर पाठींबा दिला. यावेळी तालुका उपप्रमुख नितीन ताठे व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.