चाकण येथे आज आदित्य ठाकरेंची पदयात्रा

आमदार गोरेंचा करणार प्रचार : मार्केटयार्ड येथे सभा

राजगुरूनगर- खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार आमदार सुरेश गोरे यांच्या प्रचारार्थ चाकण येथे शुक्रवारी (दि. 18) युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची पदयात्रा आणि जाहीर सभा होणार असल्याची माहिती शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव वर्पे, तालुका प्रमुख रामदास धनवटे यांनी दिली.

चाकण मार्केटयार्ड येथे सायंकाळी 5 वा या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, संपर्क प्रमुख रवींद्रजी मिर्लेकर, जिल्हा प्रमुख माऊली कटके यांच्यासह मित्र पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.