भोरच्या विकासात आणखी भर टाकणार

आमदार संग्राम थोपटे : शहरातील 17 प्रभागांतील मतदारांशी साधला संवाद

भोर- शहरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले असून सर्व कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे पूर्ण करून भोर शहराच्या विकासात आणखी भर टाकण्याचे कामही केले जाईल, असे आश्‍वासन आमदार संग्राम थोपटे यांनी दिले.

भोर विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी भोर शहरातील 17 प्रभागातील मतदारांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी या वेळी भोर शहरातील भोरेश्वर नगर , भेलकेवाडी, भोईआळी, आमराई आळी, गणेश पेठ, राजवाडा चौक, बजरंग आळी, सम्राट चौक, नवी आळी, श्रीपती नगर, चौपाटी(शेटेवाडी), वेताळपेठ, धुमाळ नगर, नगरपालिका चौक, रावळ चौक, सुभाष चौक , मशालीचा माळ, आदी प्रभागातील मतदारांशी संवाद साधला. याप्रसंगी कॉंग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, नगराध्यक्षा निर्मला आवारे, उपनगराध्यक्ष गणेश पवार, सुमंत शेटे, संजय जगताप, चंद्रकांत सागळे, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राजन घोडेस्वार, तानाजी तारू, सचिन हर्णसकर, उपनगराध्यक्ष गणेश पवार, नगरसेवक चंद्रकांत मळेकर, समीर सागळे, रामचंद्र आवारे, आशा रोमन, सोनाली मोहिते, अमृता बहिरट, वृषाली घोरपडे, आशा शिंदे, तृप्ती किरवे, रुपाली कांबळे, अमित सागळे, जितेंद्र कंक, देविदास गायकवाड, सुरेश वालगुडे, तोसिफ आतार, स्नेहा पवार यांच्यासह शहरातील आजी-माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार थोपटे म्हणाले की, भोर शहराचा विकास फक्त कॉंग्रेस पक्षाने केला आहे. शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यात आला असून, 15 कोटी रुपयांची पाणी योजना मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या शहराचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे. तसेच तालुक्‍यातील आंबेडकरी चळवळीचे श्रद्धास्थान असलेले येथील दीक्षाभूमीचे काम हातामध्ये घेतले असून त्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भोरच्या वैभवात एक आणखी भर पडत असल्याचे त्यांनी नमूद केले.

  • उद्योगधंदे आणण्यासाठी प्रयत्न सुरू
    भोर शहराजवळील बंद पडलेली भोरेश्‍वर औद्योगिक वसाहत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या ठिकाणी नवीन उद्योगधंदे आणण्यासाठी तसेच भोर शहर व परिसरातील बंद पडलेला रंग कारखाना, भोर इंडस्ट्रीज, सूत गिरणी या व इतर बंद पडलेल्या कारखान्यांची जागा शासनाच्या माध्यमातून घेऊन त्याठिकाणी नव्याने उद्योग धंदे उभारण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे येथील बेरोजगारीचे प्रश्‍न सूटणार आहे, असे आमदार थोपटे यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.