पुणे : अग्निशमनकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न कोंढव्यातील लुल्लानगरमध्ये हॉटेलला आज सकाळी आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, आगीचे वृत्त समजताच अग्निशमन विभागाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सात मजली इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर ही आग लागली असल्याने आग नियंत्रणात आणण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
ही संपूर्ण काचेची इमारत असल्याने इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणावर धूर पसरला आहे. धूर बाहेर पडावा यासाठी इमरातीच्या काचाही फोडल्या जात आहेत.
या इमरतीतमध्ये विविध कार्यालये तसेच सराफा व्यावसायिकांची दुकानेही आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.