मुंबई – ऍक्ट्रेस आणि मॉडेल पूनम पांडे गेल्या बऱ्याच दिवसांपासून आपल्या खासगी आयुष्यातील वेगवेगळ्या घडामोडींमुळे चर्चेत आहे. गेल्याच वर्षी सॅम बॉम्बे नावाच्या उद्योगपतीबरोबर तिचा विवाह झाला होता.
मात्र, आता दोघेही वेगळे झाले आहेत. सध्या तरी पूनम पांडे सिंगल आहे. आणखीन किमान 5 वर्षे कोणालाच डेट करायचे नाही, असे ठरवले असल्याचे ती अलीकडेच म्हणाली होती. मी तर आता स्वतःच्यात प्रेमात आहे. स्वतःबरोबर रिलेशनशिपमध्ये असण्यातच मजा आहे.
लाईफ खूपच छान आहे. यातच खूप मजा आहे, असे ती म्हणाली होती, पण आता तिला पुन्हा लग्न करायचे आहे. लव्ह लाईफ कसे एन्जॉय करावे, याची प्रेरणा आपल्याला कतरिना कैफकडून मिळाल्याचे देखील तिने सांगितले.
कतरिना परदेशातून आली आणि तिने बॉलीवूडमध्ये मोठे यश मिळवले आहे. तिने लव्ह लाइफ देखील खूप एन्जॉय केले आहे. मला देखील तिच्यासारखी मेहनत करून मोठे व्हायला नक्की आवडेल. तिच्याप्रमाणे एखाद्या सुसंस्कृत माणसाबरोबर लग्न करून सुखी व्हायला आवडेल.