पुणे – शहरातील सर्वच भागांमध्ये हवेच्या प्रदूषणात लक्षणीय वाढ असून, परिणामी हवेची गुणवत्ता ढासळली आहे. अभ्यासकांच्या नोंदीनुसार हवेचा गुणवत्तांक 183 इतका असून, शिवाजीनगर, निगडी आणि भोसरी येथे हवेचे सर्वाधिक प्रदूषण होते.
इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) संस्थेच्या “सफर’ उपक्रमांतर्गत देशातील दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबाद या चार महानगरांमधील हवेच्या गुणवत्तेची सातत्याने नोंद घेतली जाते. संस्थेने घेतलेल्या नोंदीनुसार, शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली असून, ती “काहीशी धोकादायक’ या स्तरावर पोहचली आहे. दरम्यान हवेचा गुणवत्तांक 183 इतका नोंदविण्यात आला असून, प्रामुख्याने पीएम 2.5 या प्रदूषकाचे प्रमाण वाढले असल्याचे या नोंदीतून समोर आले आहे. महत्वाचे म्हणजे आगामी दोन दिवसांमध्ये शहरातील हवेच्या प्रदूषणात वाढ होईल असा अंदाज आयआयटीएम-सफर संस्थेतर्फे वर्तविण्यात आला आहे.
शहरातील विविध भागांमधील पीएम 2.5 घटकाचे प्रमाण (प्रति घनमीटरमध्ये)
ठिकाण प्रमाण
शिवाजीनगर 242
निगडी 242
भोसरी 266
आळंदी 200
भूमकर चौक 193
लोहगाव 186
कोथरूड 162
हडपसर 101