मेष
पैशाची सोंग पांघरता येत नाहीत हे लक्षात ठेवून खर्च करा. मनावर संयम ठेवा. पैशाची चणचण जाणवेल. व्यवसायात व्यवहारी दृष्टीकोन लाभदायी ठरेल केलेल्या कष्टाच्या मानाने यश मिळेल. नोकरीत स्वतःचे काम स्वतः करा. अतिविश्वास टाळा. उधार उसनवार शक्यतो टाळा. घरातील व्यक्तिंचा नवीन अनुभव येईल. कामाचे वेळी सर्वजण हात वर करतील. विद्यार्थ्यांनीही मित्रांवर विसंबून राहू नये.
वृषभ
अंधविश्वास ठेवून कोणतीही कृती करु नका. व्यवसायात कामातील अडचणी कमी होतील. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. नोकरीत वरिष्ठ जादा कामाची जबाबदारी तुमचेवर सोपवतील. त्यासाठी तुमची थोडी खुशामतही करतील. घरात नको त्या कामात बराच वेळ जाईल. आप्तेष्ट, नातेवाईक यांची भेटगाठ पडेल. पाहुण्यांची ये-जा राहील. मुलांकडून सुवार्ता कळेल. कलावंत, खेळाडूंना स्पर्धेत तोंड दयावे लागेल. तरी सज्ज रहा.
मिथुन
मिळालेल्या संधीचा पूरेपूर फायदा घ्यायचा ठरवलात. तरी जीवनाचा आनंद मिळेल. कामात कार्यतत्पर रहा. व्यवसायात हातातील कामे वेळेत पूर्ण करुन मगच नवीन कामांकडे वळा. नवीन व्यक्तिंवर जादाचा विश्वास ठेवू नका. प्रयोगापेक्षा कृतीवर भर दया. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत मनाला जे पटेल तसेच वागा. कामात हेळसांड करु नका. बोलण्याचे तारतम्य बाळगा. घरात भावनेच्या भरात जाऊन निर्णय घेऊ नका. कुटुंबासमवेत वेळ मजेत जाईल.
कर्क
कार्यमग्न राहून प्रगती करण्याचा प्रयत्न राहील. व्यवसायात जुनी येणी वसुल होतील. पैशाची चिंता मिटेल. नवीन कामे दृष्टीक्षेपात असतील. कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा राहील. नोकरीत वरिष्ठ दिलेला शब्द मानतीलच हे गृहीत धरु नका. चिडचिड न करता कामाची आखणी योग्य प्रकारे करा. तुमच्या कामात कसूर होऊ देऊ नका. घरात जादाची कामे करुन दमणूक होईल. प्रकृतीची काळजी घ्या. तरुणांनी अतिधाडस करु नये.
सिंह
“”जो दुसऱ्यावर विसंबाला त्याचा कार्यभार बुडाला” ही म्हण आठवेल. तरी कामात हलगर्जीपणा न करता स्वतःची कामे स्वतः करा. व्यवसायात पैशाचे ठोकताळे चुकल्याने कामांना विलंब होईल. काही बेत पुढे ढकलावे लागतील. धंद्यात योग्य वेळी योग्य कृती करुन प्रगती साधा. नोकरीत मनाविरुद्ध वागावे लागेल. त्यामुळे तुमची चिडचिड होईल. वरिष्ठांच्या हेकेखोर स्वभावामुळे त्रास होईल. घरात मोठयांच्या प्रकृतीची काळजी घ्या. कामात मन रमवून वेळ घालवाल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण जाणवेल.
कन्या
“”स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही” हया म्हणीची प्रचिती येईल. व्यवसायात प्रयत्न केल्याशिवाय यश नाही हे लक्षात येईल. कामातील प्रगती समाधानकारक राहील. नोकरीत जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. कामानिमित्ताने परदेशगमन व लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात नवीन खरेदीचे मनसुबे आखाल. प्रियजन, आप्तेष्ट यांच्या सहवासात वेळ जाईल. काही महत्वाचे निर्णय तूर्तास पुढे ढकला.
तूळ
सभोवतालच्या व्यक्तिंच्या वागण्याने आश्चर्यचकित व्हाल व कोणाशी कसे वागायचे, बोलायचे याबाबत गोंधळून जाल. व्यवसायात बुद्धीला जे पटेल तेच निर्णय घ्या. ओळखीचा उपयोग होऊन कामे मिळतील. पैशाची स्थितीही समाधानकारक राहील. नोकरीत सहकारी कामात मदत करतील ही अपेक्षा ठेवू नका. कामात चोख रहा. व्यवहार दक्ष निर्णय पुढे उपयोगी पडतील. घरातील वादविवाद मिटतील. तरुणांनी रुसवे फुगवे होऊ देऊ नयेत. विद्यार्थ्यांनी मनन व चिंतन करावे.
वृश्चिक
स्वकर्तृत्वावर कामाचा उरक पाडाल. व्यवसायात उलाढाल मनाप्रमाणे राहील. कमी श्रमात जास्त पैसे मिळाल्याने आनंदी व्हाल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरी महत्वाच्या कामांना प्राधान्य दयाल. सहकाऱ्यांकडून खुबीने इतर कामे करुन घ्याल. जोडधंद्यातून विशेष कमाई होईल. घरात महिलांना कामात कोणतीही मदत मिळणार नाही तरी अपेक्षा ठेवू नये. एखादा ठरवलेला कार्यक्रम काही कारणाने पुढे ढकलावा लागेल. विद्यार्थ्यांनी एकाग्र चित्ताने अभ्यास करावा.
धनू
माणसांची पारख छोटया छोटया गोष्टींतून होईल व भ्रमनिरास होईल. व्यवसायात वेळप्रसंगी जो उपयोगी पडेल तो देवासमान असेल. वसुली झाल्याने आर्थिक घडी सुधारेल. मनाप्रमाणे कामे पार पडतील. नोकरीत वरिष्ठ नवीन कामाची जबाबदारी तुमचेवर सोपवतील. कार्यपद्धतीत बदल करुन बाजी माराल व कौतुकास पात्र व्हाल. घरात विचार व कृती यांचा समन्वय साधून कामे करा. इतरांची साथ मिळेल. पैशाचा अपव्यय टाळा. तरुणांनी अतिआत्मविश्वास बाळगू नये.
मकर
व्यवसायात महिनाभरात बरीच प्रगती साधू शकाल. ग्रहांची साथ आहे. कामात सामंजस्य दाखवून कामांना गती दयाल. पैशाची चिंता नसेल. सरकारी कामात यश येईल. नोकरीत तुमचे व कामाचे महत्व वाढेल. वरिष्ठांकडून अधिकारात वाढ होईल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. घरात महिलांना स्वातंत्र्य लाभल्याने समाधान मिळेल. अनावश्यक खर्च टाळण्याचा विशेष प्रयत्न राहील. तरुणांना मनाप्रमाणे पद भूषविता येईल. विद्यार्थ्यांनी मात्र अभ्यासात शॉर्टकट घेऊ नये.
कुंभ
तुमच्या मनातील इच्छा प्रत्यक्षात साकार करण्याची संधी येईल. व्यवसायात कामाच्या पद्धतीत बदल करुन काही ठोस पावले उचलाल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवीन योजना आखाल. खेळत्या भांडवलाची तरतूद केलेली लाभदायी ठरेल. नोकरीत हितशत्रूपासून सावध रहा. कामातील बेत गुप्त ठेवा. मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा करुन घ्या. घरात जुन्या प्रश्नावर व वादांवर तोडगा निघेल. महिलांना दिलासा देणारी घटना घडेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.
मीन
थोडेसे संभ्रमात टाकणारे ग्रहमान आहे तरी मनाला योग्य वाटेल तसेच वागा व निर्णय घ्या. व्यवसायात योग्य मार्ग मिळवण्यासाठी थोडे सबुरीचे धोरण ठेवा. नवीन कामांमुळे जुने हितसंबंध संपण्याची शक्यता आहे तरी शांत रहा. पैशांची आवक चांगली असेल. नोकरीत हातातील कामात बिनचूक रहा. गडबड गोंधळ टाळा. चिडचिड न करता झेपेल तेवढेच काम करा. घरात महिलांचा भावनाद्रेक होईल. पेल्यातील वादळे उठतील व पेल्यातच विरतील. डोके शांत ठेवा. प्रियजन, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील.