Horoscope | आजचे भविष्य (शुक्रवार : 23 एप्रिल 2021)

मेष : जादा सवलती व अधिकारही मिळतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल.

वृषभ : तरुणांना मनपसंत जीवनासाथी भेटेल. उलाढाल वाढेल. महिलांना केलेल्या कामाचा आनंद मिळेल.

मिथुन : वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमची किंमत कळेल. मनाप्रमाणे कामे करता येतील.

कर्क : पैशाची कुवत ओळखून कामाची आखणी करा. पैशाच्या हव्यासापायी कुसंगत टाळा.

सिंह : पैशाची स्थिती समाधानकारक राहील. तुमच्या मागण्या मूड पाहून मांडा व मान्य करून घ्या.

कन्या : जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. महिलांना मुलांकडे लक्ष द्यावे लागेल.

तूळ : हलके कान न ठेवता प्रत्यक्ष शहानिशा करावी. विद्यार्थ्यांनी अभ्यासात मनन व चिंतन करावे.

वृश्‍चिक : इतरांचेही विचार जाणून घ्या. घरात स्वतःचेच म्हणणे खरे करण्याचा अट्टाहास धरू नका.

धनु : व्यवसायात उद्‌दीष्टे डोळयासमोर ठेवून कृती कराल. पैशाची तजवीज होईल. नोकरीत अनुभव येतील.

मकर : व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे हाती घेऊन मार्गी लावा. कामे मिळवण्याचा प्रयत्न राहील.

कुंभ : नोकरीत नवीन हितसंबंध जोडले जातील. महत्वाच्या कामाची जबाबदारी तुमचेवर सोपवतील.

मीन : पैशाची स्थितीही समाधान देणारी राहील. नोकरीत सहकारी कामात मदत करतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.