Horoscope | आजचे भविष्य (शुक्रवार : 16 एप्रिल 2021)

Daily Horoscope | आजचे राशिभविष्य ।

मेष कामकाजात यश मिळेल. व्यवसायात जादा आत्मविश्‍वास बाळगू नये. महत्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून करून घ्यावीत. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत कामाचा आनंद मिळेल. नोकरदार महिलांना वरिष्ठांच्या मर्जीत राहता येईल. त्यामुळे जादा सवलती मिळतील. महिलांना वैवाहिक सुख उत्तम लाभेल. सुवार्ता कळेल. विद्‌यार्थ्यांना यशदायक ग्रहमान.

वृषभ
ओळखी व मध्यस्थीतून कामात प्रगती होईल. नवीन कामे मिळतील. व्यवसायात हातातील कामांना विलंब होण्याची शक्‍यता. तरी नाराज होऊ नका. नोकरीत नवीन संधी चालून येतील. प्रवासयोग जोडधंदयातून विशेष लाभ होईल. महिलांना मुलांची शैक्षणिक प्रगती कळेल. स्वास्थ्याबाबत मात्र थोडे अधिक दक्ष रहावे लागेल. तरूणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.

मिथुन
एखादी चांगली बातमी कानावर येईल. व्यवसाय व भागीदारीतून विशेष लाभ होईल. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत मनाप्रमाणे कामे होतील. उत्तम बदल होतील. मानसन्मान मिळेल. महिलांना यशप्राप्तीने मानसिक समाधान मिळेल. नोकरदार महिलांनी वादविवाद वाढू देऊ नयेत. तरूणांना विवाहयोग येतील. नवपरिणीतांना भाग्योदय.

कर्क
व्यवसायात अडथळे आले तरी कामाचा वेग कमी करू नका. खरेदीविक्रीतून लाभ होतील. जुनी येणी वसुल होतील. नोकरीत कामानिमित्ताने प्रवास घडेल. अचानक धनप्राप्तीचे योग येतील. नवीन ओळखीतून फायदा होईल. महिलांना सुवार्ता कळेल. मुलांची प्रगती व प्रकृतीबाबतीतील चिंता मिटेल. राहत्या घराचे प्रश्‍न मार्गी लागतील. विद्‌यार्थ्यांना अभ्यासात पूरक ग्रहमान.

सिंह
व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी योग्य ते बदल कराल. यशाची मदार तुमचेवर राहील. नवीन कामे मिळतील. नोकरदार व्यक्तिंनी सहकाऱ्यांवर विसंबून न राहणेच चांगले. कामानिमित्ताने प्रवास घडेल. सामाजिक, धार्मिक कार्यात मात्र प्रगती होईल. प्रतिष्ठा वाढेल. महिलांनी कामात लवचिक धोरण ठेवले तर विशेष फायदा होईल. मानापमान बाळगू नये. मित्रमंडळी आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील. विद्‌यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे.

कन्या
पैशाच्या व्यवहारात चोखंदळ रहाल. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घ्याल. जुनी येणी वसुल होतील. देणी देता येतील. त्यामुळे तणाव कमी होतील. नोकरीत थोडी कळ सोसलीत तर परिस्थितीत बदल होईल. मनाप्रमाणे कामे होतील ही अपेक्षा ठेवू नका. महिलांनी रागांवर नियंत्रण ठेवावे. प्रकृतीची काळजी घ्यावी. कौटुंबिक उत्कर्ष होईल. तरूणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.

तूळ
गुरू, शुक्र विशेष फलदायी ठरतील. व्यवसायात हरतऱ्हने लाभ होतील. सुवार्ता कळेल. विचार व कृती यांचा समन्वय साधून रेंगाळलेली कामे मार्गी लावाल. नोकरीत अतिस्पष्टवक्तेपणा टाळा. वादाच्या प्रसंगापासून चार हात लांब रहा. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. महिलांनी ऐकिव गोष्टींवर विश्‍वास ठेवू नये. करमणूकीत वेळ मजेत जाईल. घरगुती समारंभ ठरतील. विद्‌यार्थ्यांना मनःशांती उत्तम मिळेल.

वृश्‍चिक
व्यवसायात हितशत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवाल. त्याप्रमाणे कामात बदल करून पुढचे बेत आखाल. पूर्वी केलेल्या कामातून आता विशेष लाभ होईल. नोकरीत उत्तम बदल घडून येईल. धनलाभाची शक्‍यता हातून सामाजिक व धार्मिक कार्ये पार पडतील. महिलांनी वाद व भांडणे सामंजस्याने सोडवावीत. विनाकारण झालेले गैरसमज दूर करावेत. छोटयाश्‍या सहलीचे आयोजन कुटुंबासमवेत करावे.

धनू
कामाचा वेग वाढेल. यशाची कमान उंचावेल. पैशाची स्थिती उत्तम राहील. जुनी येणी वसूल होतील. नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. महत्वाच्या कामाची जबाबदारी तुमचेवर सोपवली जाईल. नवीन वास्तूत रहायला जाण्याचे योग येतील. महिलांना घरगुती कामातून यश मिळेल. प्रियजनांच्या जीवनातील संस्मरणीय शुभघटना साजरे कराल.

मकर
व्यवसायात उलाढाल वाढेल. महत्वाची कामे गती घेतील. आर्थिक लाभ होईल. हितचिंतकांची मदत होऊन नवीन कामे मिळतील. नोकरीत कामाचे बेत गुप्त ठेवा. सहकाऱ्यांकडून कुठलीही अपेक्षा करू नका. कामानिमित्ताने प्रवास घडेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. कलाकार, खेळाडू, राजकारणी व्यक्तिंना उत्तम यश मिळेल. भागोदय होईल. महिलांना मानमरातब मिळेल. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. कौतुक होईल विद्‌यार्थ्यांचे मन एकाग्र होईल.

कुंभ
व्यवसायात आधुनिकीकरण करून विस्तारोच बेत यशस्वी होतील. अपेक्षित पत्रव्यवहार व परदेशगमनाच्या कामांना चालना मिळेल. विरोधकांच्या कारवायांचा अचूक अंदाज येईल. नोकरीत बढती मिळेल. बेकारांना नोकरी मिळेल. जोडधंदयातून विशेष लाभ होईल. महिलांना मानसिक व शारिरीक आरोग्य जपावे लागेल. अतिसाहस करू नये. दगदग धावपळही कमी करावी.

मीन
नशिबांवर विसंबून न राहता प्रयत्नावर विश्‍वास ठेवावा. यशप्राप्ती होईल. व्यवसायात अशक्‍य वाटणाऱ्या कामात उत्तम प्रगती होईल. पैशाची स्थिती उत्तम राहील. नोकरीत कामात बिनचूक राहणे. लाभदायक ठरेल. कुसंगत टाळा. आजचे काम आजच पूर्ण करा. महिलांनी सामोपचाराने वागून कामे मार्गी लावावीत. आवडत्या छंदयातून व उपक्रमातून प्रसिद्धी मिळेल. संततीबाबत शुभ बातमी कळेल. तरूणांचे विवाह जमतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.