आजचे भविष्य (शुक्रवार, दि. ८ जानेवारी २०२१)

मेष : सरकारी नियम व इतर प्रश्‍नांकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे लागेल. दैनंदिन कामे हातावेगळी कराल.

वृषभ : कामात हितचिंतकांची मदत मिळाल्याने कामे पूर्ण होतील. नको त्या कामात बराच वेळ जाईल.

मिथुन : व्यवसायात उलाढाल वाढवण्यासाठी चाकोरीबाहेर जाऊन मार्ग अवलंबावा लागेल.

कर्क : या आठवड्यात सभोवतालच्या व्यक्‍तींकडून नवीन अनुभव येतील. पैशाचे व्यवहारात चोख रहावे.

सिंह : मंगळ, शुक्र यासारखे सकारात्मक विचार देणारे ग्रह अनुकूल असल्याने मनाप्रमाणे गोष्टी घडतील.

कन्या : व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घ्याल. तुमचा आत्मविेशास वाढेल. रेंगाळलेले प्रश्‍न मार्गी लागतील.

तूळ : रवी शनी तुमची महत्त्वाकांक्षा जागृत करतील तेव्हा धैर्याने वाटचाल करा. मुलांकडून सुवार्ता मिळेल.

वृश्‍चिक : व्यवसायात हातात पैसे आल्याने कामाचा उत्साह वाढेल. वेगळे करून दाखवण्याची जिद्द होईल.

धनु : तुमच्या वर्तुळात तुमची प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत कामाचे स्वातंत्र्य मिळाल्याने खुश असाल.

मकर : मोठ्या कामासाठी तुमची निवड होईल. तुमची पत वाढेल. इतर व्यक्‍ती तुमच्या विचारांचा आदर करतील.

कुंभ : कलावंत, खेळाडू, राजकारणी व्यक्‍तींना प्रसिद्धी मिळेल. महिलांना मानसिक समाधान लाभेल.

मीन : सभोवतालच्या माणसांचे नवीन अनुभव येतील. त्यामुळे कोड्यात पडल्यासारखे होईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.