बॉलीवूड अभिनेत्री परिणिती चोप्राने विविधांगी भूमिका साकारत इंडस्ट्रीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर देखील खूप ऍक्टिव्ह असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करत असते. सध्या परिणिती चोप्राचा एक व्हिडिओ अतिशय व्हायरल होत आहे. यात ती देसी लूकमध्ये दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये ती ऊस खाताना दिसत आहे. ती पहिल्यांदाच ऊस खात आहे. त्यामुळे तिला पहिल्या फटक्यात ऊस तोडता येत नाही. हा व्हिडिओ अंबाला येथे शूट केलेला आहे. परिणितीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या व्हिडिओला काही तासांतच लाखो व्ह्यूज आले आहेत.
तसेच काही नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले तर काहींनी तिची चेष्टा केली आहे.
परिणितीला ऊस खाता येत नव्हता म्हणून नेटकऱ्यांनी तिला एकापेक्षा एक भन्नाट प्रश्नही विचारले आहेत. काहींनी विचारले आहे की, तुझ्या टूथपेस्टमध्ये मीठ नाही का? तर काहींनी कॉमेंट केली, ‘हिच्या ओव्हर ऍक्टिंगचे 50 रुपये कापा.’
दरम्यान, वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास परिणिती चोप्राने आजपर्यंत अनेक चित्रपटातून काम केले आहे. तिचा दावत-ए-इश्क, शुद्ध देसी रोमान्स, हसी तो फसी, केसरी, मेरी प्यारी बिंदू, नमस्ते इंग्लंड, इश्कजादे असे अनेक चित्रपट प्रसिद्ध आहेत. परिणिती लवकरच रणबीर कपूरसोबत “ऍनिमल’ या चित्रपटात झळकणार आहे.