कार्ला, (वार्ताहर) – शिवजयंतीचे औचित्य साधत नुकत्याच घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंताचा सन्मान एम.एच.करियर अकॅडमी कार्ला यांच्यावतीने करण्यात आला. यावेळी शिवव्याख्याते सतीश साठे यांच्या व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले.
यावेळी माजी सभापती शरद हुलावळे, कार्ला सरपंच दीपाली हुलावळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन हुलावळे, वर्षा हुलावळे, सोनाली मोरे, संतोष हुलावळे, उमेश इंगुळकर, संजय जाधव यांच्यासह कार्ला ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवजयंती निमित्त एम.एच.करियर अअॕकडमी संस्थेतील विद्यार्थी-विद्यार्थींनींने कोराईगड किल्यावरुन शिवज्योत घेऊन आले. तसेच स्वच्छता अभियान राबवले. कार्यक्रमाच्या सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी विशाल हरिहर (वन परिक्षेत्र अधिकारी-राजपत्रित), सुशील नाईकनवरे (रेल्वे पोलीस), आवांती मोहिते व प्रतीक त्रिंबके (पोलीस शिपाई), हेमंत भालेकर (loco पायलट), सचिन लोखंडे (वरिष्ठ सहाय्यक लेखापाल) यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.