पुणे – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दि.18 व दि.19 फेब्रुवारी असे दोन दिवसे पुणे दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा यांचा दौरा होत असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. नागपूरहून विमानाने शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे विमानतळावर शहा यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर तीन वाजता वाकड येथील एका कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहे.
यानंतर मेरियट हॉटेलमध्ये एका कार्यक्रमीा शहीद पोलिसांच्या मुलींबरोबर ते संवाद साधतील. यानंतर पंडित फार्म येथे “मोदी ऽ 20 या’ मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमास ते उपस्थित राहणार असून यावेळी कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहे. यानंतर रात्री नऊ वाजता ओंकारेश्वराचे दर्शन घेणार आहेत. तसेच यानंतर खासदार गिरीश बापट यांची भेट घेणार आहेत.