मुंबई – दीपिका पदुकोण ही बॉलीवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. याच अभिनयाच्या जोरावर दीपिकाने बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास केला. 2017 मध्ये दीपिकाने होलीववूडस्टार विन डिझेलसोबत अॅक्शन फिल्म ट्रिपल एक्समध्ये काम केले होते. या चित्रपटाला तब्बल पाच वर्ष उलटून गेली आहेत. नुकतंच विन डिझलने आपल्या सोशल मीडियावरून दीपिकासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
ट्रिपल एक्स चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विन दीपिकासोबत भारतात आला होता.आता तोच क्षण आठवून त्याने दीपिकाचे आभार मानले आहेत. हॉलिवूडमधील या बड्या स्टारने दीपिकासाठी खास पोस्ट केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या चित्रपटात विन आणि दीपिकाच्या जोडीचे चांगलेच कौतुक झाले होते.
यावेळी विनने इंस्टाग्रामवरून ट्रिपल एक्स चित्रपटातील एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये तो आणि दीपिका दिसत आहेत. यावेळी डिझेलने लिहिलेले कॅप्शन चांगलेच लक्षवेधी ठरत आहे. तो लिहितो,”दीपिका पदुकोणबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. ती मला भारतात घेऊन आली होती मी नक्की पुन्हा एकदा तिकडे येईल..”
View this post on Instagram
विनने यापूर्वी देखील केलं आहे दीपिकाचं कौतुक
या चित्रपटाच्या रिलीजच्या एका वर्षानंतर, दीपिका पदुकोणने 2018 मध्ये टाइमच्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवले. त्यावेळी अभिनेत्रीचे अभिनंदन करताना विन म्हणाला होता, “दीपिका येथे फक्त भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नाही, तर ती जगाचे प्रतिनिधित्व करते.” विनने अनेक वेळा दीपिकाला परी आणि राणी असे संबोधले आहे.