मुंबई – बाहुबली फेम दिग्दर्शक एस एस राजामौली यांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आर आर आर या चित्रपटाला ऑस्कर मिळाल्यानंतर राजामौली यांचा आगामी सिनेमा कोणता असणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. राजामौली यांच्या आगामी चित्रपटात बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानसह दीपिका पदुकोण दिसणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. कॅरी ऑन जट्टा 3 या चित्रपटाच्या ट्रेलर प्रसंगी आमिर खानने व्यक्त केलेल्या या इछेनंतर या चर्चा सुरु झाल्याचं बोललं जात आहे.
सध्या बॉलिवूडमधील प्रत्येक स्टारला राजामौलीसोबत काम करायचं आहे. अशात आमिर खानला रिजनल भाषांबाबत बोलताना आपले मत व्यक्त केले. यावेळी तो म्हणाला,चित्रपटाची कथा जर चांगली असेल तर मी नक्कीच चित्रपटात काम करेल. माझी आता कोणत्याही भाषेत काम करण्याची तयारी आहे. चांगली कथा असेल तर मी नक्कीच काम करेल मला लाल सिंह चड्डाने खूपच मानसिक त्रास दिला आहे त्यामुळे आता मी चांगल्या चित्रपटांच्या शोधात आहे.
राजामौली यांनी देखील आपल्या आगामी चित्रपटाची तयारी सुरु केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आमिर खान लवकरच राजामौलीच्या आगामी चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. तर या चित्रपटात दीपिकाची दिसणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहे.
आर आर आर प्रदर्शित झाल्यानंतर राजामौली यांनी आपल्या आगामी चित्रपटाबाबत काम सुरु केले होते. या चित्रपटाची कथा आणि लोकेशन्स फायनल झाले असून आता याची कास्टिंग सुरु करण्यात आली आहे. लवकरच चित्रपटाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.