Hollywood singer Rihanna । अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगची देशभरात चर्चा आहे. दोघांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या सेलिब्रेशनमध्ये देश-विदेशातील प्रसिद्ध व्यक्ती गुजरातच्या जामनगरमध्ये पोहोचले आहेत. दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या पार्टीमध्ये हॉलिवूड सिंगर रिहानाची चर्चां होत आहे. प्री-वेडिंगच्या पहिल्या दिवशी या सोहळ्याचे मुख्य आकर्षण हॉलिवूड गायिका आणि पॉप स्टार रिहाना होती.
View this post on Instagram
रिहाना भारतात आल्यापासून ती चर्चेत राहिली आहे. अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये रिहानाने आपल्या शानदार परफॉर्मन्सने सर्वांना थिरकवले. फंक्शनला उपस्थित असलेले स्टार्सही रिहानाच्या परफॉर्मन्सचे कौतुक करत आहे. रिहानाच्या परफॉर्मन्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती तिच्या टीमसोबत स्टेजवर धमाकेदार परफॉर्मन्स देताना दिसत आहे.
अशात तिने मराठ चित्रपट सैराटमधील ‘झिंगाट’ या लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर सुद्धा रिहाना सोबत ‘झिंगाट’ गाण्यावर थिरकतांना दिसत आहे. जान्हवी कपूरचा धडक हा चित्रपट मराठी चित्रपट ‘झिंगाट’चा रिमेक आहे. या चित्रपटातील ‘झिंगाट’ गाण्यावर हॉलिवूड गायिका आणि पॉप स्टार रिहाना डान्स करतांना पाहून अनेकांना सुखद धक्का बसला आहे. सोशल मीडियावर या दोघींच्या जबरदस्त डान्स तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे.
हेही वाचा
जाणून घ्या सोशल मीडियावर कुठला पक्ष प्रचारावर किती करतो खर्च ?