holi Special : भारतातील प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. सर्व सणांमध्ये होळी आणि दिवाळी हे मुख्य सण मानले जातात. हे दोन्ही सण भारतातील मुख्य सण आहेत, परंतु भारतातील प्रत्येक राज्याची हे दोन्ही सण साजरे करण्याची स्वतःची शैली आहे. होळी हा त्यापैकीच एक. होळी हा रंगांचा सण मानला जातो जो सर्वात आवडीचा आणि उत्साही सणांपैकी एक आहे. हा एक असा सण आहे जो संपूर्ण आनंद, मजा आणि संगीत नृत्य यांच्यासह उत्साहात साजरा केला जातो. विविध राज्यांमध्ये होळी साजरी करण्याचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत.
राजस्थानातील अनेक भागात होळीचा सणही वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. राजस्थानच्या मारवाड भागात होळी साजरी करण्याची एक वेगळी शैली आहे, ज्यामुळे हा प्रदेशही प्रसिद्ध आहे. मारवाड भागात होळीचे विविध रंग पाहायला मिळतात. या भागातील लोकपरंपरा, फाल्गुन महिन्यातील गाणी आणि चंगच्या तालाचे नृत्यला विशेष महत्त्व आहे. बऱ्याच राज्यांप्रमाणे, सेलिब्रेशनसाठी ड्रमचा वापर केला जातो. तसेच राजस्थानातील मारवाड भागात होळीच्या वेळी चंगच्या (डफ ) तालावर नाचले जाते. ग्रामीण भागात होळीच्या दिवशी लोक या चंगच्या तालावर नाचताना दिसतात.
चंगच्या (डफ ) तालावर नाचण्याला गैर नृत्य म्हणतात
जेव्हा चंगचा ताल सुरु होतो तेव्हा ग्रामीण भागातील लोक एकमेकांसोबत फाग गाणी गातात. सर्वजण एकत्र नाचतात, चंगच्या तालावर गाणी गातात, हे दृश्य शहरांमध्ये ढोलाच्या तालावर नाचणाऱ्या लोकांमध्ये दिसत नाही. | holi Special rajsthan chung dance folk art
गैर नृत्य कसे असते ?
होळीच्या दिवशी मारवाड प्रदेशातील पुरुष एकमेकांसोबत गोल वर्तुळात नाचतात, त्याला गैर नृत्य म्हणतात. तर यामध्ये नाचणाऱ्यांना गैरीया असे म्हणतात. हे नृत्य सादर करण्यासाठी एक वेशभूषा आहे. ज्यामध्ये पांढरे धोतर, लाल, गुलाबी, पांढरा अंगरखा आणि भगव्या रंगाचा फेटा डोक्यावर घातला जातो. याशिवाय हे नृत्य देखील खास आहे कारण या नृत्यात पुरुष पायांना घुंगरू बांधून हे ‘गैर’ नृत्य करतात. या नृत्याची खासियत आहे कारण ते फक्त पुरुषच करतात. | holi Special rajsthan chung dance folk art