Holi 2024 : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण रंगांचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. अशा परिस्थितीत धुळवड खेळताना अनेकदा गुलाल, रंग डोळ्यात, कानात किंवा तोंडात जातो, जी भविष्यात तुमच्यासाठी मोठी समस्या बनू शकते. अशा परिस्थितीत, तुम्ही काहींसोपे उपाय वापरून अंगावरील कलरपासून तुम्ही सुटका करून घेऊ शकता.
डोळ्यात रंग गेला तर…
होळी खेळताना चुकून डोळ्यात रंग गेला तर सर्वप्रथम डोळे चोळणे टाळा. अशा परिस्थितीत, बहुतेक लोक डोळे चोळण्याची चूक करतात, ज्यामुळे समस्या वाढते आणि कधीकधी डोळे सुजतात. जर तुमच्या डोळ्यात रंग गेला तर प्रथम त्यांना थंड पाण्याने धुवा. याशिवाय डोळे साफ करायला गुलाबपाणी वापरा, यामुळे जळजळ वगैरे टाळता येते.
रंग कानात गेला तर…
होळीचे रंग कानात शिरल्याने संसर्गाचा धोकाही वाढू शकतो. असे झाल्यास, सर्वप्रथम कान खालच्या दिशेने करून त्यात फुंकर मारा किंवा सुती कापड घेऊन कानावर हलक्या हाताने मारा. कानातील रंग काढण्यासाठी तुम्ही इअरबड्स देखील वापरू शकता, परंतु जर समस्या खूप मोठी वाटत असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा. | Holi 2024
रंग तोंडात आला तर…
होळीचे रंग त्वचा आणि केसांसाठी अत्यंत हानिकारक असतात. अशा परिस्थितीत ते चुकून तोंडात गेल्यावर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे तुमचे पचन बिघडू शकते आणि तोंडातील चव खराब होऊ शकते. म्हणून, सर्व प्रथम कोमट पाण्याने गुळण्या करा आणि नंतर आपले हात पाय पूर्णपणे धुऊन काहीतरी खा किंवा प्या. | Holi 2024
सर्वात महत्वाचे..
कलर खेळल्यानंतर काही काळ आराम करा. त्यानंतर बरे वाटत नसेल तर ताबडतोब डॉक्टरकडे जा.सर्वात महत्वाचे म्हणजे घसा,कान.. नाक या गोष्टीशी अधिक छेडछाड न करता अधिक काही दुखत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच काय ते ठरवा. | Holi 2024