पिंपरी – वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने महावितरणच्या भोसरी विभागीय कार्यालयासमोर मंगळवारी (दि.29) वाढीव वीज बिलांची जाहीर होळी करण्यात आली. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. तसेच या मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा या निवेदनात दिला आहे.सोशल डिस्टन्सिंग पाळत हे आंदोलन करण्यात आले.
ऑक्टोबर 2020 पासून पुढील वीज बिलावर त्यांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज पुरवठा व त्या पुढील विजेसाठी प्रति युनिट वीज दर कमी करण्यात यावेत. लॉकडाऊन काळातील मार्च ते सप्टेंबर 2020 पर्यंतचे घरगुती तसेच सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योजक वीज ग्राहकांचे संपूर्ण वीज बिल माफ करण्यात यावे.
े वाढीव वीजदर, अव्वाच्या सव्वा वीज बिले आकारून या वर्गाच्या आर्थिक अडचणी वाढवण्याचे काम महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग सध्या करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या मागण्यांवर तात्काळ कारवाई करीत सर्व मागण्या मान्य करण्यात याव्यात, अन्यथा वंचित बहुजन आघाडी वीज ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय रहाणार नाही असा इशारा या निवेदनात दिला आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता विकास आल्हाट यांनी हे निवेदन स्वीकारले.
शहराध्यक्ष देवेंद्र तायडे याच्या नेतयृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शहर प्रवक्ते के. डी. वाघमारे, महासचिव रहीमभाई सय्यद, राजेश बारसागडे, बबन सरोदे, सनी गायकवाड, सुनीता शिंदे, निर्मला कांबळे, शारदा बनसोडे, भीमाशंकर शिंदे, शरद वाघमारे, प्रीतम कांबळे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.