मेलबर्न – ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिसा हिली हिने भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या कामगिरीला मागे टाकले आहे. तिने फलंदाजीसह यष्टिरक्षणही करताना यष्टिमागे धोनीपेक्षा जास्त बळी घेण्याची कामगिरी केली.
ऑस्ट्रेलियाचा महिला संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. महिला व पुरुष खेळाडूंमध्ये टी-20 क्रिकेट सामन्यांत धोनीने 98 सामन्यांमध्ये 91 बळी नोंदवले आहेत. आता ही कामगिरी एलिसाच्या नावावर जमा झाली असून तिने 99 व्या सामन्यांत 92 वा बळी घेतला आहे.
तसेच धोनीने टी-20 क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक म्हणून 57 झेल व 34 यष्टिचीत केले आहेत. ही कामगिरी देखील मागे टाकण्याची एलिसाला संधी आहे. एलिसाच्या नावावर 42 झेल व 50 यष्टिचीत आहेत.