पिरंगुट- ायुष्यमान भारत योजनेत समविष्ट असलेल्या प्रत्येक कुटुंबास प्रतिवर्षी पाच लाख पर्यंतचा आरोग्य विमा संरक्षण दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत कुटुंबातील सदस्यांना देशांतर्गत सर्व अंगीकृत शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये विनामूल्य आरोग्य सेवेचा लाभ घेता येईल. देशातील जवळपास 495 आणि पुणे शहर आणि ग्रामीण भागातील 31 अंगीकृत शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये विनामूल्य आरोग्य सेवेचा लाभ घेता येईल, असे प्रतिपादन भूगाव (ता. मुळशी) च्या सरपंच निकिता सणस यांनी केले.
भुगाव (ता. मुळशी) येथील तेवीस कुटुंबांचा आयुष्यमान भारत योजनेत लाभार्थी यादीमध्ये समावेश झाला आहे. या सर्व लाभार्थी कुटुंबियांना कार्डचे वाटप करण्यात आले, यावेळी निकिता सणस बोलत होत्या.
यावेळी तालुका आरोग्य विस्तार अधिकारी नमिता गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित कारंजकर, सरपंच निकिता सणस, उपसरपंच अनिकेत शेडगे, ग्रामपंचायत सदस्य सतिश इंगवले, विशाल भिलारे, राहुल काबंळे, वैशाली चोंधे, अर्चना सुर्वे, वैशाली सणस, सविता खैरे, ग्रामविकास अधिकारी मदन शेलार, ग्रामस्थ आणि लाभार्थी उपस्थित होते.