– दोरीउड्या हा पूर्ण शरीराचा व्यायाम आहे. यामध्ये तुमचे पाय आणि हातांचा वापर होतो. ज्यामुळे पूर्ण शरीराच्या स्नायूंना त्याचा फायदा होतो.
– रनिंग, सायकलिंग, स्विमिंग यापेक्षा दोरीउड्या हा हृदयासाठी उत्तम असा व्यायाम आहे.
– यासाठी तुम्हाला महागड्या उपकरणांची गरज नाही. शिवाय तुम्ही घरच्या घरीही करू शकता.दोरीउड्या म्हणजे आपण एकाच जागी उड्या मारतो, ज्यासाठी भरपूर ऊर्जा लागते.
– भरपूर कॅलरीज बर्न होतात. परिणामी वजन कमी करण्यासही मदत होते.
– एकाच ठिकाणी उड्या मारल्याने फुफ्फुसांचं कार्य सुरळीत राहण्यास मदत होते.
– श्वासोच्छवासाची प्रक्रिया नीट सुरू राहते.एका अभ्यासानुसार नियमित काही वेळ उड्या मारल्याने हाडांची घनता चांगली राहते आणि यासाठी दोरीउड्या सर्वात चांगला व्यायाम आहे.
– ज्यांना हाडांच्या समस्या आहेत, त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.