नवी दिल्ली : देशातील बहुतांश सेलिब्रेटी किंवा दिग्गज लोक सोशलमीडियावर आहेत. मात्र जे सेलिब्रेटी या मीडियापासून दूर आहेत ते आता नव्याने यात पदार्पण करत आहेत. असेच देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी इन्स्टाग्रामवर नुकतेच पदार्पण केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून अनेकदा ते सोशल मीडियावर चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला आहे. प्राण्यांच्या फोटोंपासून ते प्रेरणादायककिस्से अशा अनेक गोष्टी शेअर करत आपल्या फॉलोअर्सना प्रेरणा देण्याचे काम करत असतात. त्यांच्या याच गोष्टीमुळे फॉलोअर्सनाही रतन टाटा काय पोस्ट करणार याची उत्सुकता लागलेली असते. गुरुवारी रतन टाटा यांनी इन्स्टाग्रामवर आपला एक फोटो शेअर केला असून तो प्रचंड व्हायरल होत आहे.
रतन टाटा यांचा हा फोटो नेटकऱ्यांना प्रचंड आवडत असून अनेकांना तर हा त्यांचा फोटो आहे यावर विश्वासच बसत नाही आहे. फोटो शेअर करताना रतन टाटा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मी हा फोटो बुधवारी शेअर करणार होतो. पण नंतर मला कळले की थ्रोबॅक फोटो गुरुवारी शेअर केला जातो. यासाठीच माझ्याकडून लॉस एंजेलिसमधील हा थ्रोबॅक फोटो. या फोटोला त्यांना ThrowbackThursday असा हॅशटॅग दिला आहे.
रतन टाटा यांचा हा तरुणपणातील फोटो आहे. रतन टाटा यांच्या या फोटोला काही तासातच लाखो लाइक्स मिळाले असून कमेंट्सचा तर पाऊस पडत आहे. रतन टाटा यांचे इन्ट्राग्रामवर आठ लाख 30 हजार फॉलोअर्स आहेत. गुजरातमधील सूरत येथे 28 डिसेंबर 1937 रोजी जन्म झालेले रतन टाटा आज वर्षांचे आहेत. रतन टाटा यांनी ऑक्टोबर महिन्यात इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केलं.