Hina Khan – टीव्ही ते बॉलीवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसोबत स्वतःशी संबंधित अपडेट्स शेअर करत असते.
अशात हिना प्रकृतीबाबत अपडेट दिले आहे की, ती रुग्णालयात दाखल आहे. त्याच्याबद्दलची ही बातमी समोर येताच हिनाच्या चाहत्यांना त्याची काळजी वाटू लागली आणि चाहते सोशल मीडियावर तिच्या पोस्टवर कॉमेंट्स करत चिंता व्यक्त करत आहे.
हिना खानने तिच्या प्रकृतीबाबत माहिती शेअर केली आहे की,’मी आजारी आहे आणि गेल्या चार दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहे.’
तिने हॉस्पिटलमधील तिचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर बसलेली दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये हिनाच्या हातात थर्मामीटर दिसत आहे, ज्यामध्ये तिच्या शरीराचे तापमान 102 अंश आहे. हे शेअर करण्यासोबतच हिनाने लिहिले की, ‘माझ्या शेवटच्या चार रात्री तापामुळे वाया गेल्या. सतत 102-103 अंश ताप असतो. शरीरातील संपूर्ण ऊर्जा संपली आहे. माझे चाहते ज्यांना माझी काळजी आहे. मी लवकरच परत येईन. इंशाअल्लाह… तुमचे प्रेम असेच कायम असू द्या’