बावधन – राजकारणाचे मला नाही वाटत भय…, कारण माझ्या पाठीशी उभा आहे बावधनचा हिमालय.., असे सांगून हिमालय पतसंस्था अशीच उत्तरोत्तर प्रगती पथावर जावून लवकरच त्याच्या अनेक शाखा सुरू होवोत, त्यानंतर पतसंस्थेचे रूपांतर को ऑपरेटिव्ह बॅंकेत निश्चित होईल, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
हिमालय नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन वास्तूचा पदार्पण समारंभ उत्साहात झाला. यावेळी मंत्री आठवले बोलत होते. 16 जानेवारी 1998 मध्ये सुरू केलेल्या हिमालय नागरी पतसंस्थेचे एक तप संपवून केवळ 17000 ठेवींनी सुरूवात करण्यात आली होती. आज, 35 कोटींची उलाढाल पार करून शिखर गाठणाऱी हिमालय पतसंस्था नवीन आव्हाने पेलण्यास नवीन वास्तूमध्ये सज्ज झाली आहे.
याबाबत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल म्हणाले की, सर्व गावकरी ठेवीदारांनी ठेवलेला विश्वास हीच खरी हिमालय पतसंस्थेची मोलाची ठेव आहे. दृढ विश्वास कायम ठेवल्याबद्दल समस्त ठेवीदारांचे व कर्जदारांप्रती आदर व्यक्त करून लवकरच हिमालय पतसंस्थेच्या शाखा सुरू करण्यात येत आहेत.
यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदेरे, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, किरण दगडे, शिवसेनेचे युवा सेना प्रमुख अविनाश बलकवडे, मजुर पंचायत समितीचे अध्यक्ष के.के.पवार, नामदेव चौधरी, दत्ता जाधव, पोलीस पाटील बबनराव दगडे, परशुराम वाडेकर, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष उमेश कांबळे, माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता दगडे, बावधनच्या सरपंच पियुषा दगडे, संचालक रेखा बांदल, रमेश कांबळे, व्यवस्थापक तानाजी जाधव आदी उपस्थित होता.