नवी दिल्ली – कॉंग्रेसचे हिमाचल प्रदेश कार्याध्यक्ष हर्ष महाजन यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. हिमाचलमध्ये चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. (Himachal Congress working president Harsh Mahajan joins BJP) त्यामुळे महाजन यांच्या पक्षबदलाची घडामोड कॉंग्रेसच्या दृष्टीने मोठा हादरा ठरली आहे.
Former Working President of Himachal Pradesh Congress Shri Harsh Mahajan joins BJP in the presence of senior party leaders at party headquarters in New Delhi. #JoinBJP pic.twitter.com/sUzWePSMFH
— BJP (@BJP4India) September 28, 2022
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितीत महाजन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर स्तुतिसुमने उधळली. त्यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह आणि त्यांचे आमदारपुत्र विक्रमादित्य यांच्यावर टीकास्त्र सोडले.
दिल्लीप्रमाणेच हिमाचलमधील कॉंग्रेसची सूत्रे आई आणि मुलगा सांभाळत आहेत, असे ते म्हणाले. त्यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल यांच्यावरही निशाणा साधला.
महाजन हे हिमाचलचे माजी मंत्री आहेत. त्यांनी राज्य सरकारमध्ये आणि कॉंग्रेसमध्ये महत्त्वाची पदे भूषवले. आता चार दशकांपेक्षा अधिक काळची कॉंग्रेसची साथ त्यांनी सोडली आहे. हिमाचलमध्ये भाजपची सत्ता आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाजन यांचा प्रवेश भाजपचा उत्साह वाढवणारा आहे.