Nirbhaya Case | Seema Kushwaha । Lok Sabha Election 2024 – उत्तर प्रदेशच्या लालगंज येथील बहुजन समाज पक्षाच्या खासदार संगीता आझाद यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.
भाजपच्या मुख्यालयात पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी आझाद यांचे भाजपमध्ये स्वागत केले. आझाद यांचे पती अमिरमर्दन आझाद आणि प्रसिध्द वकिल सीमा कुशवाहा यांनीही यावेळी भाजपचे सदस्यत्व स्विकारले.
यातील सीमा कुशवाह या दिल्लीतील खळबळजनक निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील निर्भयाला न्याय मिळवून देणाऱ्या वकील आहेत. अरिमर्दन हे माजी आमदार आहेत. संगीता यांनी २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या तत्कालीन खासदार नीलम सोनकर यांचा १.६१ लाख मतांनी पराभव केला होता.
सीमा समृध्दी कुशवाहा या सुप्रीम कोर्टातील वकील आहेत. तत्पूर्वी त्या बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या होत्या. निर्भया प्रकरणात त्यांनी न्यायासाठी प्रदीर्घ लढा दिला होता. त्यामुळे चार आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते व २० मार्च २०२० रोजी त्यांना दिल्लीच्या तिहार तुरूंगात फाशी देण्यात आली.