बुलढाणा : सियाचीनमध्ये कर्तव्य बजावत असताना बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीराला वीरमरण आले आहे. अक्षय लक्ष्मण गवते यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती खराब झाली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
अक्षय गवते यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ जन्मगावी पिंपळगावसराई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. रविवारी सायंकाळी अक्षय यांचे पार्थिव छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर आज सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
Quartered in snow silent to remain, when the bugle calls they shall rise and march again
All ranks of Fire and Fury Corps salute the supreme sacrifice of #Agniveer (Operator) Gawate Akshay Laxman, in the line of duty, in the unforgiving heights of #Siachen and offer deepest… pic.twitter.com/1Qo1izqr1U
— @firefurycorps_IA (@firefurycorps) October 22, 2023
अक्षय यांची ३० डिसेंबर २०२२ रोजी ‘अग्निवीर’म्हणून भारतीय सैन्यदलात भरती झाली होती. सियाचीन मधील याचीन ग्लेशियरमध्ये ते कर्तव्यावर होते. मात्र अक्षय यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना सैनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि हृदयविकाराचा धक्का आल्याने मृत्यू झाला. मेहनत आणि जिद्दीने अक्षय अग्निवीर म्हणून सैन्यदलात भरती झाले होते. अक्षय आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तर त्यांना एक लहान बहिण होती.