हॅलो हिंदू पाकिस्तान – स्वरा भास्कर

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावरून सरकारवर जळजळीत टीका

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर त्यावरुन देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यातच अभिनेत्री स्वरा भास्करनेही यावर आपले मत व्यक्त करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ट्विटच्या माध्यमातून स्वरा भास्करने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध दर्शवला आहे. यावेळी तिने राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (सीएबी) च्या माध्यमातून मोहम्मह जिन्ना यांचा पुनर्जन्म झाला असल्याची टीका करत हॅलो हिंदू पाकिस्तान म्हटलं आहे,

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आठ तासांच्या वादळी चर्चेनंतर सोमवारी मध्यरात्री लोकसभेत मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने तर विरोधात मते पडली. आता राज्यसभेत हे विधेयक मंजूर करताना सरकारची कसोटी लागेल.


स्वरा भास्करने ट्विटमध्ये लिहिले आहे की, भारतामध्ये नागरिकत्त्वाला धर्माचा आधार नाही. धर्माच्या आधारे भेदभाव केला जाऊ शकत नाही. तसेच धर्माच्या आधारे कोणताही निर्णय घेतला जाऊ शकत नाही. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकातून जाणुनबुजून मुस्लिमांना दूर ठेवलं जात आहे. NRC/CAB प्रोजेक्‍ट मोहम्मद अली जिना यांचा पुनर्जन्म आहे. हॅलो हिंदू पाकिस्तान.

या विधेयकामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीनच शेजारी देशांतील अल्पसंख्याक व्यक्तींना नागरिकत्व दिले जाणार आहे. श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या विधेयकाचा लाभ मिळणार नाही. धर्माच्या आधारे भेदभाव करणे हे संविधानविरोधी असल्याचा युक्तिवाद विरोधी पक्षांतील वक्‍त्यांनी केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)