येरवडा – येरवडा परिसराला सोमवारी सायंकाळी अर्धा तास पडलेल्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. या पावसात मासळी बाजाराजवळील एक मोठे झाड उम्नळुन पडले. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
मात्र या मोठ्या झाडाखाली सात दुचाकी, एक रिक्षा तसेच अनेक टपऱ्या सापडल्याने मोठे
नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. वाहन चालक पाण्यातून वाट काढत जात होते.
येरवडा क्षेत्रीय कार्यालयासमोर गाडीतळ, येरवडा मुख्य रस्ता, भाटनगर जनतानगर, लक्ष्मीनगर, रामनगर, शाहदवल बाबा चौक या ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते अनेक वाहने यात बंद पडली होती. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुक कोंडीही झाली होती. अनेकांच्या घरात हे पाणी घुसले होते.