औरंगाबाद : विविध वर्तमानपत्रात संपादक म्हणून छाप उमटविणारे ज्येष्ठ पत्रकार सुभाषचंद्र वाघोलीकर यांचे नुकतेच हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 71 वर्षांचे होते.
त्यांची विश्लेषणाची वेगळी हातोटी होती. राज्यातील अनेक पत्रकारांना त्यांनी घडविले. 12 वर्षांहून अधिक काळ त्यांनी “मराठवाडा’ दैनिकात काम केले. संपादक म्हणून ते 2011 मध्ये सेवानिवृत्त झाले होते.
सामाजिक आंदोलनांतही त्यांचा सक्रिय सहभाग असे. समाजवादी विचारसरणीचा त्यांच्यावर प्रभाव होता.