पुणे – गेल्या काही दिवसांपूर्वी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने संगमवाडी येथील नदीपात्रा जवळ कारवाई केली होती. दरम्यान, ही कारवाई केल्यानंतर साहित्य तसेच पडून होते.
पत्रे, लाकडाच्या वस्तू, भंगार इत्यादी साहित्य याठिकाणी पडलेले होते. मात्र, आज (दि. २८) सकाळी 9.30च्या सुमारास या सर्व वस्तुंना भीषण आग लागली आहे. नायडू हॉस्पिटल आणि येरवडा येथील अग्निशामक केंद्राच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.